राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; अकोल्याच्या सहा खेळाडूंचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST2021-09-27T04:20:54+5:302021-09-27T04:20:54+5:30
अकोला : भारतीय टेनिस बाॅल क्रिकेट फेडरेशनच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेश राज्य टेनिस बाॅल असोसिएशनने आग्रा येथे आयोजित केलेल्या ज्युनिअर ...

राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; अकोल्याच्या सहा खेळाडूंचा समावेश
अकोला : भारतीय टेनिस बाॅल क्रिकेट फेडरेशनच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेश राज्य टेनिस बाॅल असोसिएशनने आग्रा येथे आयोजित केलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ हा अंतिम पोहोचला असून, महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व अकोल्याचा समर्थ नंदकिशोर सोनोने हा खेळाडू करीत आहे, हे विषेश. अकोल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
भारतीय खेल मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शालेय खेळ महासंघ, दिल्ली व भारतीय रोजगार मंत्रालयांच्या मान्यताप्राप्त भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मार्गदर्शनात आग्रा येथे ज्युनिअर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशातून जवळपास सर्वच राज्यांतील खेळाडू संघ पोहोचले होते. महाराष्ट्र संघात अकोल्याच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे अकोल्याचा समर्थ सोनोने हा महाराष्ट्र संघाचा कप्तान असून, त्याच्या नेतृत्वात संघ खेळत आहे.
----------
अकोल्याच्या या सहा खेळाडूंचा समावेश
आग्रा येथे ज्युनिअर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघात अकोल्याच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये संघाचा कप्तान समर्थ नंदकिशोर सोनोने, अनुराग वैभव ओळंबे, राम चंद्रकांत अहिरकर, सौम्य नितीन लोदया, कुणाल किरण निमकंडे, तनिष्क सचिन सातारकर यांना संघात स्थान मिळाले आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक शिवाजीराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
------------------------