राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन शुक्रवारपासून
By Admin | Updated: December 10, 2014 01:19 IST2014-12-10T01:19:09+5:302014-12-10T01:19:09+5:30
अमेरिकेच्या समाजसेविका गेल ऑम्व्हेट व श्रमिक चळवळीचे नेते भारत पाटणकर यांची उपस्थिती.

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन शुक्रवारपासून
अकोला : राष्ट्रसंतांच्या सर्वसमावेशक साहित्याचा परिचय सर्वांना व्हावा, या उद्देशाने सलग दुसर्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वगताध्यक्ष डॉ. गजानन नारे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला अमेरिकेतील प्रसिद्ध समाजसेविका गेल ऑम्व्हेट उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच श्रमिक चळवळीचे नेते व विद्रोही चळवळीचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचीदेखील यावेळी उपस्थिती राहणार आहे. संमेलनासाठी राज्यभरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर प्रेम करणारे गुरुदेवप्रेमी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.