नथ्थुजी सुरजुसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:23 IST2021-08-21T04:23:41+5:302021-08-21T04:23:41+5:30

बाळापूर : येथील माजी नगरसेवक नथ्थुजी तानाजी सुरजुसे (८५) यांचे दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Naththuji Surjuse passed away | नथ्थुजी सुरजुसे यांचे निधन

नथ्थुजी सुरजुसे यांचे निधन

बाळापूर : येथील माजी नगरसेवक नथ्थुजी तानाजी सुरजुसे (८५) यांचे दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------------

कस्तुराबाई नारायणराव भरणे

अकोला: केळीवेळी येथील कस्तुराबाई नारायणराव भरणे (८०) यांचे दि. १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. प्रतिष्ठित नागरिक नितीन नारायणराव भरणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. (फोटो)

------------------------

गंगूबाई राहणे

खिरपुरी: येथून जवळ असलेल्या टाकळी (खुरेशी) येथील गंगूबाई श्रीराम राहाणे (८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. प्रतिष्ठित व्यक्ती गजानन श्रीराम रहाणे यांच्या त्या आई होत. (फोटो)

-------------------------

पातूर नंदापूर येथे मोहरम उत्सव

पातूर नंदापूर : दरवर्षी मोहरम हा सण उत्सवात साजरा करण्यात येत असतो, परंतु गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. येथे मोजक्याच उपस्थित सण साजरा करण्यात आला. मशीदमध्ये नमाज पडल्यानंतर मौलाना हाफिज शहानवाज हुसेन यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Naththuji Surjuse passed away