वेटलिफटींग अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्यपदकासह नाशिकची आघाडी
By Admin | Updated: December 11, 2014 00:06 IST2014-12-10T23:55:07+5:302014-12-11T00:06:52+5:30
१0 वी राज्यस्तरीय युवा वेटलिफटींग अजिंक्यपद स्पर्धा.
वेटलिफटींग अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्यपदकासह नाशिकची आघाडी
अँड. नीलिमा शिंगणे/अकोला
नाशिक संघाची सोनाली कालसरपे व धनश्री पवार यांनी आपल्या वजनगटात सर्वाधिक वजनभार उचलून सुवर्णपदकावर ताबा मिळविला. त्यांच्याच संघ सहकारी कुशाली गांगुर्डे आणि मोनिका कदनोर या दोघींनी रौप्यपदकाची कमाई करून १0 वी राज्यस्तरीय युवा भारोत्तोलन स्पर्धेवर पहिल्याच दिवशी आघाडी घेऊन अजिंक्यपद मिळविण्याचा मार्ग खुला केला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषक भवन येथे १0 वी राज्यस्तरीय युवा मुले व मुली भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेला बुधवार, १0 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत राज्यभरातून १६५ मुले व १४५ मुली सहभागी झाल्या आहेत. अंतिम फेरीमध्ये मुलींच्या गटात ४४ किलो वजनगटात नाशिकच्या सोनाली कालसरपे हिने प्रथमस्थान पटकावित सुवर्णपदक पटकाविले. तिचीच संघ सहकारी कुशाली गांगुर्डे हिने याच वजनगटात रौप्यपदक मिळविले. पुण्याची सारिका शिंगारेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ४८ किलो वजनगटात नाशिकचीच धनश्री पवार हिने जेतेपद मिळविले. सातार्याची संस्कृती देवकर हिने रौप्य तर सांगलीची अमृता खिल्लारे हिला कांस्यपदक मिळाले. ५३ किलो वजनगटात जळगावची विशाखा महाजन हिने आपल्या संघासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले. नाशिकची मोनिका कदनोर हिला रौप्यपदक मिळाले. विदर्भाची प्रगती चावरे हिने वर्धा जिलचे प्रतिनिधित्व करीत आपल्या संघासाठी पहिले पदक मिळविले. प्रगतीने कांस्यपदकावर समाधान मानले. मुलांच्या गटात ५0 किलो वजनगटात अहमदनगरच गणेश थापा याने सुवर्णपदक मिळविले. पुण्याच्या हमराज सुनार याने रौप्य तर सांगलीच्या शुभम कोळेकर याने कांस्यपदक मिळविले.
पदक तालिका
जिल्हा पदक संख्या
नाशिक ४
पुणे २
सांगली २
अहमदनगर १
वर्धा १