नारायण राणेंचा मुर्तीजापूरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 18:23 IST2021-08-25T18:22:49+5:302021-08-25T18:23:15+5:30

Protest against Narayan Rane in Murtijapur : मुर्तीजापूरात शिवसेनेच्यावतीने अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. 

Narayan Rane's protest in Murtijapur | नारायण राणेंचा मुर्तीजापूरात निषेध

नारायण राणेंचा मुर्तीजापूरात निषेध

मूर्तिजापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा मुर्तीजापूरात शिवसेनेच्यावतीने अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. 

चार गाढवांची मूर्तिजापुरात धिंड काढत त्यांना कैफीयतीसह शिवसेना तालुका प्रमुख संगित कांबे, शहर प्रमुख विनायक गुल्हाने, तालुका उप प्रमुख उदय शिंदे, विजय साबळे, शहर उप प्रमुख, प्रवीण टाक, रवि शितोळे, डॉ.अतुल ठोकळ, विकास लकडे, गजानन चौधरी, बंडू लांडे आदी असंख्य शिवसैनिकानी उप विभागीय अधिकारी कार्यालयात हजर केले व नारायण राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिले.            केंद्रीय मंत्रीमंडळाने अशा मंत्र्याचा तात्काळ राजिनामा घ्यवा व मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली. 

 

सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून राज्य चालविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्याही आहिताचा कधी विचार करू शकत नाहीत. त्यांच्यासारख्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंचं डोकं फीरलंय, त्यांनी घरी बसून औषधोपचार घ्यावा. यानंतर असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडाल्या जाईल. राणेंना विदर्भात येऊ दिल्या जाणार नाही.

-संगित कांबे. तालुका प्रमुख, शिवसेना, मूर्तिजापूर.

Web Title: Narayan Rane's protest in Murtijapur