नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक रेल्वेगाडी एक एप्रिलपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST2021-03-31T04:18:42+5:302021-03-31T04:18:42+5:30

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, नांदेड येथून विविध भागात जाण्याकरिता एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वेगाड्या सुरू ...

Nanded - Shri Ganganagar weekly train from April 1 | नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक रेल्वेगाडी एक एप्रिलपासून

नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक रेल्वेगाडी एक एप्रिलपासून

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, नांदेड येथून विविध भागात जाण्याकरिता एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. यामध्ये ०७६२३ नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर गुरुवार) ही गाडी १ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ०६.५० वाजता सुटेल आणि वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, अबु रोड, जोधपूर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १९.२० वाजता पोहोचेल. ही गाडी दर गुरुवारी अकोला स्थानकावर येईल.

०७६२४ श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) ही गाडी ३ एप्रिलपासून श्री गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि बिकानेर, जोधपूर, अबुरोड, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री ०२.३० वाजता पोहोचेल. ही गाडी दर सोमवारी अकोला स्थानकावर येईल.

Web Title: Nanded - Shri Ganganagar weekly train from April 1