नांंदेड-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे पुन्हा धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:50 PM2019-07-08T14:50:14+5:302019-07-08T14:53:59+5:30

अकोला : नांदेडहून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानक दरम्यान धावणारी विशेष रेल्वे पुन्हा सुरू झाली आहे.

Nanded-Hazrat Nizamuddin special train will run again! | नांंदेड-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे पुन्हा धावणार!

नांंदेड-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे पुन्हा धावणार!

Next


अकोला : नांदेडहून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानक दरम्यान धावणारी विशेष रेल्वे पुन्हा सुरू झाली आहे. ही रेल्वे तीन महिन्यांपर्यंत आठवड्यातून एकदा धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तीन महिन्यांत या रेल्वेच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०२४८५ क्रमांकाची (नांदेड-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस) या महिन्यापासून प्रत्येक गुरुवारी रात्री ११ वाजता नांदेडहून प्रस्थान करेल. ही गाडी सकाळी ५.४० वाजता अकोला येथे येत खंडवाकडे रवाना होणार आहे. खंडवाहून ही रेल्वे इटारसी,भोपाळ, झासी, आग्रा होत शनिवारी रात्री २.१० वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात या रेल्वेगाडीचा क्रमांक ०२४८६ होणार असून, प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी सकाळी ५.५० वाजता निघणार आहे. ही गाडी अकोल्यात १.२० वाजता पोहोचेल. त्यानंतर ही गाडी नांदेडकडे रवाना होईल. या गाडीत एक सेकंड एसी, एक थर्ड एसी, आणि ७ स्लीपर, ६ जनरल, २ एसएलआर आरक्षित कोटा राहणार आहे.


हैदराबाद-जयपूर विशेष रेल्वेही याच महिन्यात

दक्षिण-मध्य रेल्वेद्वारे याच महिन्यात हैदराबाद-जयपूर विशेष रेल्वेही सोडली जाणार आहे. ०२७३१ क्रमांकाची (हैदराबाद-जयपूर) रेल्वे आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी अकोल्यातील शुक्रवारच्या उत्तररात्री ४.२० वाजता पोहोचेल. ही गाडी या महिन्यात ६, १३, २० आणि २७ रोजी आणि आॅगस्ट महिन्यात ३, १०, १७, २४, ३१ आणि सप्टेंबरमध्ये ७, १४, २१, २८ तारखेला अकोल्यात उपलब्ध राहणार आहे.

 

Web Title: Nanded-Hazrat Nizamuddin special train will run again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.