शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

शाळा अनुदानित असूनही इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:34 IST

अकोला : शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येत नाही. असे असताना, होलीक्रॉस शाळेकडून इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाह्य लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येत नाही, असा शासनाचा निर्णय आहे. शाळेतील वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांकडून अडीच हजार रुपये आणण्यास बजावले आहे. दिलेल्या पैशांची कोणतीही पावती होलीक्रॉस हायस्कूल व्यवस्थापनाकडून पालकांना देण्यात येत नाही.

अकोला : शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येत नाही. असे असताना, होलीक्रॉस शाळेकडून इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाह्य लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. वर्गशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांकडून २५०० रुपये आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे.शहरातील होलीक्रॉस हायस्कूलला शासनाचे अनुदान प्राप्त आहे. या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण नि:शुल्क आहे. या शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीत एकूण ११०० विद्यार्थी शिक्षण घेतात. होलीक्रॉस हायस्कूलला शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान मिळते. अनुदानित शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आहे आणि या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येत नाही, असा शासनाचा निर्णय आहे. असे असतानाही होलीक्रॉस हायस्कूलचे व्यवस्थापन दरवर्षी विद्यार्थ्यांकडून इतर खर्चाच्या नावाखाली प्रत्येकी अडीच हजार रुपयांची वसुली करीत आहे. यंदासुद्धा शाळेतील वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांकडून अडीच हजार रुपये आणण्यास बजावले आहे. नव्हे, तर दररोज विद्यार्थ्यांना पैसे आणले का? असा तगादाच वर्गशिक्षकांकडून लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पालकांकडे पैशांची मागणी केली. काही पालकांनी काहीही आढेवेढे न घेता विद्यार्थ्यांना पैसे दिले. परंतु, काही जागरूक पालकांनी, विद्यार्थ्यांकडे विचारणा केली असता, शाळेने इतर खर्च म्हणून अडीच हजार रुपयांची मागणी केली असल्याचे सांगितले. शाळेला शासकीय अनुदान मिळत असताना, आम्ही पैसे कशासाठी द्यायचे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, दिलेल्या पैशांची कोणतीही पावती होलीक्रॉस हायस्कूल व्यवस्थापनाकडून पालकांना देण्यात येत नाही. यासंदर्भात पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)

२७ लाखांच्या वसुलीचा हिशेब नाही!होलीक्रॉस हायस्कूल दरवर्षी इतर खर्चाची सबब पुढे करून विद्यार्थ्यांकडून पैशांची वसुली करते.विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये वसूल केले, तर ती रक्कम २७ लाखांवर पोहोचते. दरवर्षी शाळा अशा पद्धतीने लाखो रुपये गोळा करते. विशेष म्हणजे, या पैशांची पालकांना पावती मिळत नाही. या पैशाचे कोणतेही लेखापरीक्षण (आॅडिट) होत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टिकोनातून पालक गप्प बसतात आणि शाळा त्याचाच फायदा घेत असल्याचे एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

होलीक्रॉस हायस्कूल हे अनुदानित आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांकडून कोणत्याही कारणांसाठी पैसे घेता येत नाही. शाळा विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. ही गंभीर बाब आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी