अकोला शहरात नालेसफाईची मोहीम सुरू
By Admin | Updated: May 20, 2014 19:08 IST2014-05-20T18:49:10+5:302014-05-20T19:08:40+5:30
अकोला शहरातील नालेसफाईची मोहीम महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अकोला शहरात नालेसफाईची मोहीम सुरू
अकोला : शहरातील नालेसफाईची मोहीम महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
शहरातील १६२ नाल्यांच्या सफाई कामांसाठी मनपाच्यावतीने निविदा प्रकाशित करण्यात आल्या असून, ५५ नाल्यांच्या साफसफाईचे काम जेसीबी मशीनद्वारे सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी खेताननगर, जवाहर नगर ते संताजीनगर, आपातापा रोड, रमाबाई आंबेडकर नगर व इतर भागातील नाला साफसफाईची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे मनपाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.