नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला ऑक्टोबरअखेरपर्यंत मुदतवाढ
By राजेश शेगोकार | Updated: September 23, 2022 11:01 IST2022-09-23T11:01:22+5:302022-09-23T11:01:41+5:30
नागपूर-मडगाव (०११३९) ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.

नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला ऑक्टोबरअखेरपर्यंत मुदतवाढ
राजेश शेगोकार, अकोला
अकोला : सणासुदीच्या दिवसत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही गाडी अकोला स्थानकावरून जाणारी असल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे.
नागपूर ते मडगाव (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर-मडगाव (०११३९) ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल. नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.