नगरविकास आघाडीचे सहा नगरसेवक अपात्र

By Admin | Updated: February 27, 2016 01:56 IST2016-02-27T01:56:48+5:302016-02-27T01:56:48+5:30

काँग्रेसमध्ये प्रवेश करणा-या सहा नगरसेवकांवर अपात्रतेची कु-हाड कोसळली.

Nagarvikaas Aegri's six corporators ineligible | नगरविकास आघाडीचे सहा नगरसेवक अपात्र

नगरविकास आघाडीचे सहा नगरसेवक अपात्र

शेगाव (जि. बुलडाणा): शेगाव नगर परिषदेमधील नगर विकास आघाडीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या सहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी शुक्रवारी अपात्र घोषित केले. सदर निकालाची माहिती शहरात पोहोचताच काँग्रेसच्या ब गटाकडून फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. आघाडीचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, नगरसेवक संदीप काळे, रवींद्र रायणे, नगरसेविका ज्योती विजय गणोरकार, उषा विठ्ठल डाबेराव, रूपाली दिनेश शिंदे या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. जून २0१५ मध्ये नगराध्यक्ष शारदा कलोरे यांनी एका याचिकेद्वारे नगरविकास आघाडीच्या सहा नगरसेवकांनी अनधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने त्यांचे न.प.चे सदस्यपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात वादी व प्रतिवादी पक्षांचे साक्षी, पुरावे व उलटतपासणी जिल्हाधिकारी यांनी घेतली. सदर प्रकरणाला विलंब होत असल्याचे कारण देत सौ. कलोरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात निकाल लवकर लावण्यासाठी अर्ज सादर करून, या प्रकरणाचा निकाल २६ फेब्रुवारीपयर्ंत लावण्यात यावा, असा जिल्हाधिकारी यांच्या नावे आदेश पारित करून घेतला होता. त्यामुळे आज या प्रकरणाचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

Web Title: Nagarvikaas Aegri's six corporators ineligible