अकोला: अरेबिया राष्ट्रात १८ ते २१ जानेवारी १८ दरम्यान होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील प्रसिद्ध उर्दू गजलकार नईम फराज यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित या मुुशायऱ्याचे निमंत्रण त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुशाय-यात नईम फराज यांच्यासह डॉ. बसीम बरेलवी, अबरार काशिफ, मुजफर हनफी, ईकबाल अशर, अलिना इतरत, नदीम शाद, फैयाज फारुकी, लियाकत जाफरी, सरदार सलीम आदी प्रख्यात शायर सहभागी होणार आहेत. भारतातील सुप्रसिद्ध गजलकार अबरार काशिफा (बाळापूर-अकोला) हे सूत्रसंचालन करणार आहेत. अकोल्यातील नईम फराज यांच्या गजलेची द्वीपदी दिल्लीच्या संसदेत गाजली होती. तेव्हापासून अकोल्यातील नईम फराज अधिकच उजेडात आले.रियाधच्या भारतीय शाळेत १८ जानेवारी रोजी, त्यानंतर दम्माम, जुबैल आणि जेद्दाह येथे २१ जानेवारी रोजी लागोपाठ होऊ घातलेल्या या मुशाय-यात ते हजेरी लावणार आहेत. मुशाय-यात सहभागी होणारे शायर उमरादेखील करून येणार आहेत. मूळचे अकोल्यातील असलेले नईफ फराज उच्चविद्या विभूषित असून, दर्यापूरच्या नगर परिषदेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी ‘एक श्याम शहिदोके नाम’ हा कार्यक्रम यशस्वी केला. अकोल्यातील वीर शहिदांना या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नईम फराज यांच्या या यशाचे अकोल्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील नईम फराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 21:04 IST
अकोला: अरेबिया राष्ट्रात १८ ते २१ जानेवारी १८ दरम्यान होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील प्रसिद्ध उर्दू गजलकार नईम फराज यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील नईम फराज
ठळक मुद्देभारतीय दूतावासाच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित या मुुशायऱ्याचे निमंत्रण त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. दम्माम, जुबैल आणि जेद्दाह येथे २१ जानेवारी रोजी लागोपाठ होऊ घातलेल्या या मुशायऱ्यात ते हजेरी लावणार आहेत. मूळचे अकोल्यातील असलेले नईफ फराज उच्चविद्या विभूषित असून, दर्यापूरच्या नगर परिषदेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे.