माय-लेकाची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST2021-04-17T04:17:51+5:302021-04-17T04:17:51+5:30

मन नदीपात्रात मनीषा पाटील व तिचा मुलगा प्रसाद याने मंगळवारी उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात महिलेचा भाऊ ...

My-Lake's suicide; Charges filed against both | माय-लेकाची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

माय-लेकाची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मन नदीपात्रात मनीषा पाटील व तिचा मुलगा प्रसाद याने मंगळवारी उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात महिलेचा भाऊ गणेश गोपाल पाटील (रा. बुलडाणा) याने बाळापूर पोलिसात फिर्याद दिली की, त्याची बहीण मनीषा पाटील हिचा पती सोपान बाळासाहेब हागोने व सुखदेव इंगळे नामक व्यक्ती हे मनीषा पाटील हिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या विवंचनेतच महिलेने नदीपात्रात उडी घेतली, त्यापाठोपाठ मुलानेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारे सोपान हागोने व सुखदेव इंगळे यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: My-Lake's suicide; Charges filed against both