ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुस्लीम बांधवांनी काढली शोभायात्रा
By Admin | Updated: December 25, 2015 03:00 IST2015-12-25T03:00:40+5:302015-12-25T03:00:40+5:30
शोभायात्रेत मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी.

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुस्लीम बांधवांनी काढली शोभायात्रा
अकोला : शहरातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी ईद-ए-मिलादुन्नबी हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला. या निमित्त शहरातील विविध मार्गांंवरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेची सुरुवात ताजनापेठ परिसरातील मोहम्मद अली चौक येथून करण्यात आली. मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद साहब रिजवी कारंजवी यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचे नेतृत्व मरकजी अहल-ए-सुन्नतुल जमात तथा शोभायात्रा कमिटीचे अध्यक्ष हाजी महमूद खान यांनी केले. मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद साहब रिजवी कारंजवी यांनी शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखविली. आपल्या पारंपरिक मार्गांंनी मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा पुन्हा ताजनापेठ परिसरात पोहोचली. तेथे सामूहिक प्रार्थना करण्यात आली. मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद साहब रिजवी कारंजवी यांनी देशात शांतता व सौहार्द कायम राहण्याची दुआ मागितली. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.