मूर्तिजापूर तालुका @ ८६.९६%

By Admin | Updated: May 31, 2017 01:18 IST2017-05-31T01:18:31+5:302017-05-31T01:18:31+5:30

मूर्तिजापूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.९६ टक्के लागला. तालुक्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयातील २३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Murtijapur taluka @ 86.96% | मूर्तिजापूर तालुका @ ८६.९६%

मूर्तिजापूर तालुका @ ८६.९६%

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.९६ टक्के लागला. तालुक्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयातील २३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी गाडगे महाराज विद्यालयातून २४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर सर्वात कमी पारद येथील संकेत कांबे कॉलेजमधून ४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
तालुक्यातील संकेत कांबे सायन्स कॉलेज पारद आणि गुलाबरावजी बांबल उच्च माध्यमिक विद्यालय किनखेड यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यलयाचा ९९.१५ टक्के लागला. भारतीय ज्ञानपीठ महिला क. महाविद्यालयाचा निकाल ९८.२५ टक्के लागला.
गाडगे महाराज महाविद्यालयाचा निकाल ६१.८८ टक्के, टेकाडे कनिष्ठ महाविद्यलय कुरूम ७९.५४ टक्के , जयाजी महाराज सायन्स/आर्ट, देशमुख एचएसईसी स्कूल रिहपूर ९६.२२, विद्याभारती क. महाविद्यालय शेलूबाजार ८३.०७, अन्वर उर्दू हायस्कूल माना ९३.५४, सुनील राठोड कनिष्ठ महाविद्यालय दहातोंडा ९४.१३, जवाहर विद्यालय जामठी बु ८९.४७ टक्के, आदर्श कन्या क. महा. ९१.७८, वसंतराव नाईक विद्यालय हातगाव ९३.१८, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंगरुळ कांबे ८०.१५, जय नारायण बु न.प. महाविद्यालय ५० टक्के, छगनराव भुजबळ क. महा. कंझरा ९२.१० टक्के, अर्चना विद्यालय आणि महाविद्यालय लाखपुरी ६४.१५, बाबासाहेब धाबेकर महाविद्यालय कुरूम ८६.८४, नवाब उर्दू महाविद्यालय ९२.६८ टक्के, मेरसिंग बंघू गोवर्धनसिंग राठोड क. आश्रमशाळा ९७.९५ टक्के, भाऊसाहेब देशामुख कनिष्ठ महाविद्यालय घुंगशी ९३.५४ टक्के, गुलाबराव गावंडे कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव निंघोट ८६.११ टक्के, बबनराव चौधरी क. महाविद्यालय ब्रह्मी ७३.४१ टक्के , सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्याल ८५.७१ टक्के, गाडगे महराज आर्ट, कॉमर्स कॉलेज ८८.१५, जयाजी महराज विद्यालय आणि अनंतराव देशमुख हायस्कूल ९१.०२ असा निकाल लागला.

Web Title: Murtijapur taluka @ 86.96%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.