मूर्तिजापूर शहर पोलिसांचे शहरात पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:20 IST2021-09-18T04:20:43+5:302021-09-18T04:20:43+5:30
शासनाने कोरोनामुळे अनेक नियम लागू केलेले आहे. सर्व नागरिकांनी गणेश मंडळाच्या सदस्यांनी, शासनाने लागू केलेल्या आदेशाचा काटेकोरपणे पालन करून ...

मूर्तिजापूर शहर पोलिसांचे शहरात पथसंचलन
शासनाने कोरोनामुळे अनेक नियम लागू केलेले आहे. सर्व नागरिकांनी गणेश मंडळाच्या सदस्यांनी, शासनाने लागू केलेल्या आदेशाचा काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. शहरात कोणत्या ठिकाणी विनाकारण गर्दी न करता आपल्या मंडळांनी नियमाप्रमाणे गणेश विसर्जन करावे. जे कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. शांतता स्थापित करून गणेश उत्सव साजरे करावे. असेही आवाहन शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले. यावेळी ग्रामीणचे ठाणेदार पांडव उपनिरीक्षक मानकर वानखडे इंगळे व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.