मूर्तिजापुरात घरफोडीत ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST2021-03-01T04:21:08+5:302021-03-01T04:21:08+5:30

मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागाच्या गजबजलेल्या आदर्श कॉलनीतील घर फोडून चोरट्यांनी ४२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शक्तीसिंग ...

In Murtijapur burglary case of Rs 42,000 | मूर्तिजापुरात घरफोडीत ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

मूर्तिजापुरात घरफोडीत ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागाच्या गजबजलेल्या आदर्श कॉलनीतील घर फोडून चोरट्यांनी ४२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

शक्तीसिंग दिलीपसिंग ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ फेब्रुवारीपासून घराला कुलूप लावून ते नातेवाइकांकडील लग्नकारिता कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांचे घर उघडे असून, दाराचा कडीकोंडा तोडल्याची माहिती शेजारच्यांकडून मिळताच ते शनिवारी (ता.२०) परतले. त्यांना घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले व कपाटातील रोख १३ हजार ५०० रुपये व सोन्याचे दागिने, चांदीचे सिक्के व चांदीचे काही भांडे, असा एकूण ४२ हजार १०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसांनी भादंविच्या ३८०, ४५४, ४५७ कलमांतर्गात गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नागोराव भांगे करीत आहेत.

चोरी झालेल्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर सुद्धा चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत असून, त्यात भामटे हातात शस्त्र घेऊन जात असल्याचेही दिसत असल्यामुळे लवकरच चोरटे गजाआड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: In Murtijapur burglary case of Rs 42,000