मूर्तिजापूर येथे ‘लोकमत’च्यावतीने व वंदेमातरम् आपत्कालीन पथकांच्या सहकार्याने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात १० जुलै रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास सोनोने, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, पोलीस निरीक्षक सचिन यादव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, नगरसेवक भारत जेठवाणी, प्रा. राजकन्या खणखणे, सचिन देशमुख, द्वारकाप्रसाद दुबे, गंपू शर्मा, प्रवीण नागपुरे, देविदास गोळे, संजय गुप्ता, राजकुमार नाचने यांनी भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी वंदेमातरम् आपत्कालीन पथक, शासकीय रक्त पेढी, अकोला, नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ कोकणवाडी, ज्ञाननर्मदा बहुद्देशीय संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच गजानन वरघट, रवी गोंडकार, विलास वानखडे, विष्णू लोडम, अमोल वानखडे, समाधान इंगळे, अक्षय वानखडे, जीतू सिरसाट, नेहा इंगळे, रिंकू भटकर यांनी योगदान दिले.
----------------
वंदे मातरम् आपत्कालीन पथकाला मदत
सातत्याने लोकसेवा करणाऱ्या येथील वंदे मातरम् आपत्कालीन पथकाच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकमत’ने घडवून आणलेल्या या रक्तदान शिबिरात नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी आर्थिक मदत दिली.