अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:19+5:302020-12-12T04:35:19+5:30

अकोट : अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाइपने मारहाण करून हत्या केल्याची घटना ...

Murder of wife on suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

अकोट : अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाइपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपी पतीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

तालुक्यातील बोर्डीनजीक असलेल्या सुकळी येथील सिद्धार्थ जगन्नाथ धुंदे याने लोखंडी पाइपने पत्नी शीतल धुंदे हिला मारहाण केली. या मारहाणीत पत्नी शीतल रक्ताचे थोराळ्यात पडली आणी तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी पती सिद्धार्थ धुंदे याला अटक केली. आरोपीजवळून डोक्यावर वार केलेला पाइप हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी सिद्धार्थ धुंदे याला अकोट न्यायालयात हजर केले असता १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Murder of wife on suspicion of immoral relationship