काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्यास अटक

By Admin | Updated: June 30, 2017 01:09 IST2017-06-30T01:09:20+5:302017-06-30T01:09:20+5:30

अकोला : अमरावती जिल्ह्यातील वाढोळा येथे किरकोळ वादातून काकाची हत्या करणाऱ्या फरार पुतण्यास खदान पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

The murder of Kaka was arrested for the murder | काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्यास अटक

काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्यास अटक

अकोला : अमरावती जिल्ह्यातील वाढोळा येथे किरकोळ वादातून काकाची हत्या करणाऱ्या फरार पुतण्यास खदान पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.
अमरावती जिल्ह्यातील वाढोळा येथील करणसिंग अत्तरसिंग आंधरेले याने किरकोळ वादातून स्वत:च्या काकाची हत्या केली होती. ही घटना २१ जूनला रात्री घडली होती. घटनेनंतर आरोपी करणसिंग हा फरार झाला होता. या प्रकरणात अमरावती येथील वरूळ पोलीस ठाण्यात करणसिंगविरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार असलेल्या आरोपीला देवी खदान परिसरात त्याच्या नातेवाइकाकडे लपून बसल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी करणसिंगला देवी खदान येथून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके, किशोर सोनोने, सागर धारस्कर, पोलीस हवालदार उज्जैनकर यांनी केली आहे. आरोपी करणसिंगला अमरावती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

Web Title: The murder of Kaka was arrested for the murder