शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

विवाहितेच्या खून प्रकरणी सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:45 PM

अकोला - बोरगाव वैराळे येथील रहिवासी एका विवाहितेच्या  खुनातील आरोपींची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष सुटका केली. बोरगाव वैराळे येथे अलका शुध्दोधन डोंगरे असे मृत महिलेचे नाव असून तीला जाळणाऱ्या शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.नेर येथील रहिवासी अलका रामधन तायडे या मुलीचे ...

ठळक मुद्देअलका शुध्दोधन डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे.विवाहनंतर शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांनी माहेरवरुन पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरीक छळ सुरु केला होता.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले.

अकोला - बोरगाव वैराळे येथील रहिवासी एका विवाहितेच्या  खुनातील आरोपींची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष सुटका केली. बोरगाव वैराळे येथे अलका शुध्दोधन डोंगरे असे मृत महिलेचे नाव असून तीला जाळणाऱ्या शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.नेर येथील रहिवासी अलका रामधन तायडे या मुलीचे लग्ण फ ेब्रुवारी २०१५ मध्ये बोरगाव वैराळे येथील रहिवासी शुध्दोधन गोवर्धन डोंगरे याच्याशी झाले होता. विवाहनंतर शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांनी माहेरवरुन पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरीक छळ सुरु केला होता. सासरी छळ सुरु असल्याचे तीन ेआई- वडीलांना सांगीतले होते, त्यावर काही तोडगा निघण्याआधीच अलका डोंगर (तायडे) ६ सप्टेंबर २०१५ रोजी ती जळाली होती. तीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तीने मृत्यूपुर्व दिलेल्या बयानामध्ये पती शुध्दोधन डोंगरे याने गडवा पडल्याच्या कारणावरुन वाद घातला त्यानंतर त्याचे वडील गोवर्धन व आई पंचफुला या दोघांनी तीला पकडले व शुध्दोधन याने तीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याचे तीने बयाणात नमुद केले होते. या प्रकरणी उरळ पोलिसांनी सदर तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०४, ३०७ आणि ४९८ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले मात्र साक्षीदारांच्या बयानामध्ये आलेली तफावत व परिस्थीतीजन्य पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने तीनही आरोपींची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. दिलदार खान व फौजीया शेख तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.कीरण खोत यांनी कामकाज पाहीले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयCrimeगुन्हा