मुरलीधर जुनगडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:44+5:302021-01-22T04:17:44+5:30
मुरलीधर जुनगडे अकोला : जुने शहरातील साईनगर भागातील रहिवासी मुरलीधर जुनगडे (८२) यांचे अल्पशा आजाराने २० जानेवारी रोजी रात्री ...

मुरलीधर जुनगडे यांचे निधन
मुरलीधर जुनगडे
अकोला : जुने शहरातील साईनगर भागातील रहिवासी मुरलीधर जुनगडे (८२) यांचे अल्पशा आजाराने २० जानेवारी रोजी रात्री निधन झाले. त्यांच्यावर २१ जानेवारी रोजी जुने शहरातील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे. (फोटो आहे.)
पार्वताबाई सारडा
अकोला : येथील पार्वताबाई सारडा (८२) यांचे दीर्घ आजाराने १९ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली असा आप्त परिवार आहे. त्या प्रतिष्ठित व्यावसायिक शरद सारडा व डॉ. संजय सारडा यांच्या मातोश्री होत.
रामचंद्र आठवले
अकोला : महाकाली नगर येथील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र गोंडूजी आठवले यांचे २० जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई असा आप्त परिवार आहे. (फोटो)
----------------------------
विजयी उमेदवारांचे सरपंच खुर्चीकडे लक्ष
निहिदा : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवार, १८ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आरक्षण रद्द झाल्याने आता निवडून आलेल्या उमेदवारांचे सरपंच पदाच्या खुर्चीकडे लक्ष लागले आहे.
----------------------------------
ग्रामीण पत्रकार दिन साजरा
जामठी बु. : ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. पी. एल. सिरसाट यांचा स्मृतिदिन २१ जानेवारी रोजी ‘ग्रामीण पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी चंदा सिरसाट, पी. एन. बोळे, गजानन हरणे, प्राची सिरसाट आदी उपस्थित होते.
-------------------------------
खरप बु. ते खरप फाटा रस्त्यावर जीवघेणा खड्डा
म्हातोडी : खरप बु. - खरप फाटा या रस्त्यावर जीवघेणा खड्डा असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या खड्ड्यात मुरूम टाकण्यात आला; मात्र मुरूम रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
-----------------------------------
घुसर-सांगळूद रस्त्यावरील पुलांना कठडेच नाहीत
सांगळूद : घुसर-सांगळूद मार्गावरील पुलांना कठडेच नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच असते. या मार्गावरील पुलांवर कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
मजुरांअभावी कापूस शेतातच
बोरगाव मंजू : परिसरात तूर सोंगणी व कापूस वेचणीचे काम एकाच वेळी आल्याने परिसरातील सिसा, मासा, बोंदरखेड, सांगळूद परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, मजुरांअभावी काही शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडून आहे.
------------------------------------------
चिखलगाव शेत शिवारात भुईमुगाच्या पेरणीला सुरुवात
चिखलगाव : येथील शेतशिवारात भुईमुगाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यंदा सततचा पाऊस झाल्याने सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पेरणीला सुरुवात केली आहे.
--------------------------------
वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी साड्यांचा आधार
बाळापूर : ग्रामीण भागात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी साड्यांचा आधार घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
-----------------------------------------
डम्पिंग ग्राउंडमुळे रेडवा ग्रामस्थ त्रस्त
बार्शिटाकळी : शहरातील केरकचरा रेडवानजीक असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो. यामुळे रेडवा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
--------------------------------