नगरपालिका कर्मचा-यास मारहाण

By Admin | Updated: July 22, 2016 00:28 IST2016-07-22T00:28:54+5:302016-07-22T00:28:54+5:30

पातूर येथील घटना; क्षुल्लक कारणावरून मारहाण; कर्मचा-यांचे काम बंद आदोलन.

Municipal staff beat up | नगरपालिका कर्मचा-यास मारहाण

नगरपालिका कर्मचा-यास मारहाण

पातूर (जि. अकोला): नगरपालिकेचे कर्मचारी विनोद माहुलीकर यांना क्षुल्लक कारणावरून शे. रशीद शे. मोहम्मद याने मारहाण केल्याची घटना २१ जुलैचे दुपारी १ वाजताचे सुमारास घडली. शे. रशीद यांनी नगरपालिकेत येऊन विनोद माहुलीकर यास आपले शौचालयाचे मंजूर झालेले पैसे खात्यात अद्याप जमा का केले नाहीत, अशी विचारणा करून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर थापड, बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामध्ये नगरपालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३३२,५0४, ५0६, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच विनोद माहुलीकर याने आपणास मारहाण केली अशी तक्रार शे. रशिद शे. मोहम्मद याने पोलिसात दिली.त्यावरून भादंविच्या कलम ३३२, ५0४,५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Municipal staff beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.