रिपाइं महानराध्यक्ष जिल्ह्यातून तडीपार!

By Admin | Updated: June 3, 2017 01:34 IST2017-06-03T01:34:59+5:302017-06-03T01:34:59+5:30

रिपाइं-आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश एसडीओ ओमप्रकाश अग्रवाल यांनी मंगळवारी दिला.

The municipal corporation of Ripai | रिपाइं महानराध्यक्ष जिल्ह्यातून तडीपार!

रिपाइं महानराध्यक्ष जिल्ह्यातून तडीपार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलिसात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं) आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) ओमप्रकाश अग्रवाल यांनी मंगळवारी दिला.
जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत रिपाइंचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या पृष्ठभूमीवर त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार गजानन कांबळे यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी ओमप्रकाश अग्रवाल यांनी ३० मे रोजी दिला.

Web Title: The municipal corporation of Ripai