शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:27 PM

महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.

अकोला : प्लास्टिक आणि कचरामुक्त शहराच्या अंमलबजावणीसाठी अकोला महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना मंगळवारी डोस दिला. १७ सप्टेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त कापडणीस यांनी ही बैठक घेतली. शहर प्लास्टिकमुक्त करणे, कचरा घंटागाडीद्वारे शहरातील शंभर टक्के कचरा उचलणे, कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त इतरत्र कचरा टाकणाºयांवर तसेच शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक विक्री व वापर करणाºयांवर दंडात्मक कार्यवाही करणे, ट्रॅक्टरद्वारे शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, कचरा विलगीकरण करून गोळा करणे, कचरा घंटागाडीमध्ये आवश्यकतेनुसार डीझल देणे, पडीत कंत्राटदाराने काम न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करणे आदींबाबत सूचना दिल्या. सोबतच स्वच्छतेच्या कामामध्ये दिरंगाई किंवा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, तसेच सर्व अधिकारी-कर्मचाºयांनी आपली कर्तव्ये नीट पार पाडावी, आदींबाबत सूचना दिल्या, तसेच बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथ घेतली. या सभेमध्ये मनपा उपायुक्त रंजना गगे, क्षेत्रीय अधिकारी प्रशांत राजुरकर, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, श्याम बगेरे, शहर समन्वयक दीपा गणोरकर, प्र.मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोशे, सर्व आरोग्य निरीक्षक तसेच ट्रॅक्टर कंत्राटदार आदींची उपस्थिती होती. 

आरोग्य निरीक्षकास केले बडतर्फअकोला महापालिकेतील आउट सोर्सिंगमधील आरोग्य निरीक्षक शुभम पुंड यांची सेवा मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तडकाफडकी  कामावरून कमी केली. मनपा आयुक्तांना पुंड निरीक्षक असलेल्या अनेक भागात कचरा दृष्टीस पडल्याने आणि स्वच्छता होत नसल्याने त्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या ८० प्रभागांतील २९ विभागांत महापालिकेची यंत्रणा आणि इतर प्रभागात ठेके पद्धतीने कामकाज होत आहे. प्रतिविभागात १२ मजूर कार्यरत असताना आणि त्यांच्यावर लक्षावधीचा खर्च होत असतानादेखील सफाई का नाही, असा प्रश्न मनपा आयुक्तांनी उपस्थित करून पुंड यांच्यावर मंगळवारी ही बडतर्फीची कारवाई केली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका