शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

महापालिका आयुक्तांनी घेतली विविध विभागांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:57 PM

अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत.

अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. त्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ हे रजेवर गेल्यापासून महापालिकेची शिस्त बिघडली होती. कर्मचारी बेफिकीर झाले होते. मनपा आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर संजय कापडणीस यांनी सर्वात आधी शिस्तीवर भर दिला आहे. त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांची झाडाझडती घेतली. यामध्ये दहा कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामध्ये सुनील नकवाल, आरोग्य स्वच्छता विभाग, अशोक जाधव, शिपाई कर विभाग, मुकुंद गणोजे, उपभियंता जलप्रदाय, दिनेश गोपनारायण, कनिष्ठ अभियंता जलप्रदाय विभाग, रवींद्र शिरसाट, अभिलेखा, राजेश दांदळे माहिती अधिकार कक्ष, चंचल ढोणे शिपाई आवक-जावक, निर्मला डोंगरे लिपिक संगणक, रफीक अहमदखान स्वीय सहायक रोखपाल विभाग, दीपा गोठवाल माहिती अधिकार कक्ष या कर्मचाºयांचा समावेश आहे. या सर्वांचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, आयुक्तांनी जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग अथवा इतर विभागांच्या फाइलवर तसेच टिप्पणीवर स्वाक्षरी करणाºया प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वाक्षरी करून त्याखाली स्वत:चे नाव, तारीख व आपल्या पदनामाचा उल्लेख करणे अनिवार्य आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.विभाग प्रमुखांना दिले अधिकार!प्रशासकीय कामकाज अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालावे, यासाठी आयुक्तांनी नागरिकांची तथा नगरसेवकांची कामे तातडीने त्यांच्याच स्तरावर निकाली काढण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना महापालिकेत आल्यानंतर कामासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नको, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासकीय एक भाग म्हणून उपायुक्त सुमत मोरे यांनी काही महत्त्वपूर्ण अधिकार आयुक्तांनी बहाल केले आहेत.

 

महापालिका प्रशासनाला शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कामासाठी महापालिकेत धाव घ्यायची अन् अधिकारी कर्मचाºयांनी दांडी मारायची, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशाप्रमाणे झाडाझडती नियमित घेतली जाणार आहे. आज वेतन कपातीचे निर्देश दिले आहेत, यानंतर असाच प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.- संजय कापडणीस, आयुक्त महापालिका.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका