मनपा प्रशासनाने बाजोरिया मैदानाची जागा ताब्यात घ्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:56+5:302021-04-21T04:18:56+5:30
अकोला : जनता भाजी बाजारालगतच्या बाजोरिया मैदानावर महापालिकेच्या सांस्कृतिक भवनाचे आरक्षण आहे. त्यामुळे मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेच्या मूल्यांकन रकमेचा ...

मनपा प्रशासनाने बाजोरिया मैदानाची जागा ताब्यात घ्यावी!
अकोला : जनता भाजी बाजारालगतच्या बाजोरिया मैदानावर महापालिकेच्या सांस्कृतिक भवनाचे आरक्षण आहे. त्यामुळे मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेच्या मूल्यांकन रकमेचा भरणा करून ही जागा तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी भाजपचे महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी मंगळवारी केली.
महानगरपालिकेने मुंगीलाल बाजोरिया नावाने ओळखल्या जाणारी जागा ताब्यात घेण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केेला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेचा आगाऊ ताबा मनपा प्रशासनाला दिला आहे. यापूर्वी मनपाने जनता भाजीबाजार व जुने बसस्थानकाच्या जागेची मूल्यांकन रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे. यादरम्यान, आरक्षित बाजोरिया मैदानाच्या जागेची मूल्यांकन रक्कम मनपाने तातडीने जमा करण्याची आवश्यकता आहे. ही रक्कम जमा करून मनपा प्रशासनाने सदर जागेचा ताबा घ्यावा, अशी मागणी भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केली आहे.
संस्थाचालकांचा अर्ज खारिज
मुंगीलाल बाजोरिया मैदानाच्या जागेवर मनपाचे आरक्षण आहे. या संदर्भात सदर शाळेच्या संचालक मंडळाने मनपा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर जागा संस्थेला देण्याकरिता अर्ज दिला होता. सदर अर्ज दोन्ही ठिकाणी खारीज झाला आहे. तसेच या संदर्भात शासनाकडे अर्ज दाखल केला असला तरी त्यामध्ये शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याची माहिती विजय अग्रवाल यांनी दिली.