‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक

By Admin | Updated: August 3, 2016 01:50 IST2016-08-03T01:50:20+5:302016-08-03T01:50:20+5:30

अकोला जिल्ह्यातील परिस्थिती; दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल.

Munga peak sinking in 'baruil' | ‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक

‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक

संतोष येलकर / अकोला
सतत बरसणार्‍या पावसाचे पाणी शेतात साचल्याने, जिल्ह्यात खारपाणपट्टय़ातील बारुल्यात (१२ गावे) मुगाचे पीक करपले आहे. त्यामुळे या भागात मुगाचे उत्पादन बुडाल्याने दोन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस चांगला बरसत असला तरी, सतत पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात बारुला म्हणून ओळखल्या जाणार्‍या १२ गावांमधील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे बारुल्यात बहुतांश शेतांमध्ये पेरणीनंतर उगवलेल्या मुगाचे पीक करपले आहे. बारुल्यातील आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, घुसर, सांगळूद इत्यादी गावांमधील बहुतांश शेतांमध्ये उगवलेले पीक करपले असून, एकरी होणारे चार क्विंटल मुगाचे उत्पादन बुडाल्याचे वास्तव आहे. अशीच परिस्थिती या भागातील अनकवाडी, आखतवाडा, हुजरे मोहम्मदपूर, घुसरवाडी, म्हातोडी, दोनवाडा व लाखोंडा या गावांमध्येही असल्याचे चित्र आहे.
गत दोन वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थितीत पिके बुडाली होती. त्यानंतर यावर्षी चांगला पाऊस बरसत असला तरी, सतत बरसणार्‍या पावसामुळे पावसाचे पाणी शेतात साचत असल्याने, मुगाचे पीक बुडाले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

कर्ज काढून पेरणी केली; पण पीक बुडाले!
दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी चांगला पाऊस बरसत असल्याने, पीक चांगले होणार असल्याची अपेक्षा होती; परंतु सतत पाऊस बरसत असल्याने शेतात साचणार्‍या पाण्यामुळे मुगाचे पीक करपले. पीक कर्ज काढून पेरणी केली; मात्र मुगाचे पीक करपल्याने पिकाचे उत्पादन बुडाले. पेरणीसाठी केलेल्या खर्चाएवढेही मुगाचे उत्पादन होणे कठीण आहे, असे या भागातील संबंधित शेतकर्‍यांनी सांगितले.

सोयाबीन पिकाचेही नुकसान!
बारुला भागात अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन पीकही करपले आहे, तसेच काही शेतांमध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचेही नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

ह्ययाह्ण गावांमध्ये करपले मुगाचे पीक!
बारुल्यातील आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, घुसर, सांगळूद, आखतवाडा, अनकवाडी, एकलारा, घुसरवाडी, म्हातोडी, हुजरे मोहम्मदपूर व दोनवाडा इत्यादी गावांच्या शिवारातील मुगाचे पीक करपले आहे.

Web Title: Munga peak sinking in 'baruil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.