शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्याचे बुकिंग आठवडाभर हाऊसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 06:39 IST

दरही प्रचंड वाढले; ४ ते ५ हजार प्रवासभाडे

 लोकमत न्यूज नेटवर्कअकाेला : अकाेल्यावरून मुंबई तसेच पुण्याकडे जाण्यासाठीचे बुकिंग आठवडाभर हाउसफुल असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व ट्रॅव्हल्स संचालकांनी दिली. अकाेला जिल्ह्यातील हजाराे तरुण-तरुणी नाेकरीसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि नागपूर येथे कार्यरत आहेत. हे नाेकरदार दिवाळी सणासाठी गावाकडे परतले हाेते. मात्र आता त्यांनी परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व खासगी बसचे बुकिंग सुरू केले आहे. 

या दाेन्ही लांब पल्ल्याच्या बसेसचे दर प्रचंड वाढले असतानाही आठवडाभर या गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल असल्याचे वास्तव आहे. दिवाळीच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी उसळली असून, आठवड्यानंतर १५ दिवस ही गर्दी कमी कमी हाेत राहील, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पाच शहरांमध्ये सर्वाधिक गर्दी मुंबई, पुणे, नाशिक व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे दर वाढले असताताही बुकिंग फुल आहे.

परतीच्या प्रवासाची स्थितीपरतीच्या प्रवासात मात्र गर्दी कमी झाल्याचे वास्तव असून, या गाड्या परतीच्या प्रवासात खालीच येत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासात थांबे वाढवून या बसफेऱ्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. परतीच्या प्रवासात दर कायम आहेत, मात्र येणाऱ्यांची संख्याच नसल्याचे वास्तव आहे.

अकाेल्यावरून पुण्याकडे जास्त फेऱ्याअकाेल्यावरून पुणे व नाशिक येथे जाण्यासाठी जास्त बसफेऱ्या लावण्यात आलेल्या आहेत. शिवशाही या बससह निमआराम व हिरकणी बसेसही पुणे, औरंगाबाद, नाशिक व नागपूरसाठी साेडण्यात येत आहेत. या मार्गावर ६० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही बुकिंग सुरूच आहे.

लांब पल्ल्याच्या फेऱ्या वाढविल्याअकाेल्यावरून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूरसाठी १४ नाेव्हेंबर ते २४ नाेव्हेंबर या कालावधीसाठी १०० पेक्षा अधिक बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.  २४ नाेव्हेंबरनंतर या बसफेऱ्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती सू्त्रांनी दिली आहे.

खासगी ट्रॅव्हल्सला प्रचंड प्रतिसादराज्य महामंडळाच्या बसेससाेबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्याची माहिती आहे. या ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवासाचे दरही माेठ्या प्रमाणात वाढविले आहे; मात्र त्यानंतरही अकाेला शहरातून पुणे व मुंबईसाठी राेज ३० पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स रवाना हाेत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेDiwaliदिवाळी