मुंबई पोलिसांचे पथक अकोल्यात

By Admin | Updated: August 27, 2015 00:54 IST2015-08-27T00:54:11+5:302015-08-27T00:54:11+5:30

चोरीची दुचाकी जप्त, इराणी वसाहतमध्ये आढळली होती दुचाकी.

Mumbai police team in Akolat | मुंबई पोलिसांचे पथक अकोल्यात

मुंबई पोलिसांचे पथक अकोल्यात

अकोला - ठाणे जिल्हय़ातून चोरलेली दुचाकी अकोल्यातील इराणी वसाहतमध्ये आढळली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस बुधवारी अकोल्यात दाखल झाले असून, त्यांनी सदर दुचाकी जप्त केली. मुंबई पोलीस अकोल्यात दाखल झाल्याची नोंद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ठाणे जिल्हय़ातील उल्हासनगर येथील एम एच 0५ सीडी ५९६६ क्रमांकाची दुचाकी ठाण्यातून ११ एप्रिल २0१५ रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याच क्रमांकाची दुचाकी सिटी कोतवाली पोलिसांनी इराणी वसाहतमधून २ महिन्यापूर्वी जप्त केली होती. या दुचाकीचे चेचीस क्रमांक व इतर माहिती पोलिसांनी घेउन मुंबई पोलिसांना दिल्यानंतर सदरची दुचाकी उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी मुंबई पोलीस अकोल्यात दाखल झाले असून, त्यांनी दुचाकी जप्त केली. आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पोलिस सदर दुचाकी घेऊन मुंबईला रवाना झाले.

Web Title: Mumbai police team in Akolat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.