मुंबई-हटिया द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:43+5:302021-04-15T04:17:43+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०११६७ डाऊन मुंबई-हटिया ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनन्स, मुंबई येथून दर ...

Mumbai-Hatia bi-weekly special train from today | मुंबई-हटिया द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आजपासून

मुंबई-हटिया द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आजपासून

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०११६७ डाऊन मुंबई-हटिया ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनन्स, मुंबई येथून दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला येथे दर गुरुवारी व रविवारी येणार आहे.

०११६८ अप हटिया-मुंबई ही विशेष गाडी हटिया येथून शुक्रवारी आणि सोमवारी १८.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.

या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला येथे थांबे असणार आहेत. १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ११ द्वितीय आसन श्रेणी अशी या गाडीची संरचना आहे. पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाडीत केवळ कन्फर्म तिकिटावरच प्रवास करता येणार आहे.

Web Title: Mumbai-Hatia bi-weekly special train from today