चिमुकल्यासह विवाहिता बेपत्ता
By Admin | Updated: June 8, 2016 02:25 IST2016-06-08T02:25:27+5:302016-06-08T02:25:27+5:30
विवाहिता व तिच्या मुलाच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना.

चिमुकल्यासह विवाहिता बेपत्ता
अकोला: मलकापूर परिसरातील २९ वर्षीय विवाहिता मुलासह दोन दिवसांपूर्वी अचानक घरात कोणालाही न सांगता निघून गेली. याप्रकरणी खदान पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. २९ वर्षीय महिला तिच्या सहा वर्षीय मुलाला घेऊन बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी विवाहिता व तिच्या मुलाच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविली आहेत.तपास सुरू आहे.