शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुकीम अहमद व शेख शफी हत्या प्रकरण; पैशाचा पाऊस उठला दोघांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 12:38 IST

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते. मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

- सचिन राऊत

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील आझाद कॉलनीमध्ये या दोघांची गळा आवळून हत्या झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जंगलात लावण्यात आली.आप नेते मुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते, तर अशाच प्रकारे दोन ते तीन गट कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रात्री-बेरात्री जंगलामध्ये फिरायचे. यासाठी त्यांच्यासोबत मांत्रिकही असायचे. गत अनेक वर्षांपासून त्यांचा हा खटाटोप सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात यश येत नसल्याने तीनही गटात अंतर्गत कलह सुरू झाला. याच कलहात दोन मौलवी जे स्वत: मांत्रिक होते, त्यांचेही वाद सुरू झाले. या वादातच या गटातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रारी सुरू केल्या. कट रचून बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या गटातील सहकाºयांनी एकमेकांच्या विरोधात रचले. तेलंगणातील अदिलाबाद, हिंगोली जिल्ह्यात व अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात या गटातील सदस्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत. एकमेकांना फसविण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागल्याने त्यांचे वाद विकोपाला गेले. या वादातच मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा कट रचल्या गेला. ३० जुलै रोजी रात्री आझाद कॉलनी येथील मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. यांचे जेवण सुरू असतानाच मौलवी तसब्बूरने १३ आरोपींना दोघांचीही माहिती दिली. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली. मध्यरात्री दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरातील जंगलात नेऊन खोल दरीत फेकण्यात आले, त्यावर दगडांचा खच टाकण्यात आला. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी दोनदा तीन कार बदलल्या. संगनमताने कट रचून हे हत्याकांड घडविले. मात्र, अकोला पोलीस प्रशासन ताकदीने कामाला लागल्यानंतर, या प्रकरणाचा तीन दिवसांतच पर्दाफाश केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrimeगुन्हा