बनावट कागदपत्रांच्या आधारे गाळय़ाची विक्री
By Admin | Updated: October 20, 2014 01:52 IST2014-10-20T01:52:14+5:302014-10-20T01:52:14+5:30
सिव्हिल लाईन पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल.

बनावट कागदपत्रांच्या आधारे गाळय़ाची विक्री
अकोला : बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी संकुलातील एका गाळय़ाची १0 लाख रुपयांमध्ये विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी गिरीनगरात राहणार्या स्नेहल श्रीकांत सोमण, शास्त्रीनगरातील दिलीप देवीचंद चौधरी यांच्यावर रविवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. व्हीएचबी सोसायटीमधील मुकेश लक्ष्मणसिंह बिसेन यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या प्लॉट क्र. ८/१ सीट क्र ७६ ए व्यापारी संकुलामधील १७ क्रमांकाचा गाळय़ाचे आरोपी स्नेहल सोमण आणि दिलीप चौधरी यांनी स्वत:चे नावाने बनावट कागदपत्रे तयार करून गाळय़ाची परस्पर १0 लाख रुपयांमध्ये विक्री केली. तसेच महापालिकेतील अधिकार्यांकडे बनावट कागदपत्र सादर करून त्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी भादंवि कलम ४0३, ४0६, ४२0, ४२३, ४६८, ४७0, ४७१, १७७, १८२ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.