शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता दोन हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:14 IST

अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली.

ठळक मुद्देअतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याने तक्रारकर्त्यास २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर २२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला.२२ हजार रुपयांची लाच मागीतल्याचे समोर आले तसेच ‘टोकन’ म्हणूण दोन हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले.

अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. क्लास वन अधिकारी असलेल्या शिरसे याने केवळ दोन हजार रुपयांची लाच घेतल्याने महावितरण कार्यालयातील लाचखोरांचे पितळ उघडे झाले आहे.सौर उर्जा प्रकल्पाच्या निर्मीतीसाठी योग्यता प्रमाणपत्र (फीजीबीलीटी रिपोर्ट) देण्यासाठी तसेच तक्रारकर्त्याने काही विजचोरांची माहिती महातिवरण कंपनीला दिल्यानंतर त्यामधील १० टक्के बक्षिसाची रक्कम देण्यासाठी महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याने तक्रारकर्त्यास २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर २२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर सुरुवातीचा दोन हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी मंगळवारी सकाळी दुर्गा चौकातील शहर विभागाच्या कार्यालयाचे ठिकाण ठरले. मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार आधीच अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता २२ हजार रुपयांची लाच मागीतल्याचे समोर आले तसेच ‘टोकन’ म्हणूण दोन हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम अभियंता शिरसे हा स्विकारत असतांनाच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली असून मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात संतोष दहीहंडे,पोना सुनील राऊत,पोशि राहुल इंगळे,पोशि सुनील येलोने,पोशि निलेश शेगोकार,चालक कैलास खडसे यांच्यासह कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग