शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

जिल्हा कृषी पतसंस्थाच्या संघात घोटाळ्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:29 PM

गटसचिव, सहायक, लिपिकांची नियमबाह्य भरती, सेवानिवृत्तांना नियमबाह्यपणे अनेक वर्ष सेवेत ठेवून त्यांच्या वेतनाचेही घोटाळे अकोला-वाशिम जिल्हा कृषी सेवा सहकारी पतसंस्थांच्या संघात घडले आहेत.

अकोला: दोन जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून वेळेवरच संपूर्ण व्याजासह वसुली केल्यानंतर शासनाकडून मिळणाºया व्याज सवलतीची रक्कम त्यांना न देताच ती हडपण्यासह गटसचिव, सहायक, लिपिकांची नियमबाह्य भरती, सेवानिवृत्तांना नियमबाह्यपणे अनेक वर्ष सेवेत ठेवून त्यांच्या वेतनाचेही घोटाळे अकोला-वाशिम जिल्हा कृषी सेवा सहकारी पतसंस्थांच्या संघात घडले आहेत. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालात त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याप्रकरणी बीड जिल्हा बँकेप्रमाणेच सहकारी संस्था कायद्यातील कलम ८९(अ) प्रमाणे चौकशी करण्याचीही शिफारसही केली आहे. उपनिबंधकांच्या अहवालानुसार १० जूनपर्यंत कारवाई न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा तक्रारकर्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांच्यासह इतरांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.अकोला जिल्हा सुपरव्हिजन को-आॅप. सहकारी संघ मर्यादित अकोला, या संस्थेच्या नामकरणात बदल करण्यात आला. ३१ मे २०१६ रोजी उपविधीमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी पतसंस्थांचा संघ, मर्यादित अकोला असा बदल करण्यात आला. या संघाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कामकाज पाहतात. नावात बदल केल्यानंतर त्यामार्फतच गटसचिव, सहायक गटसचिवांची नियुक्ती करण्यात आली. तसेच एका गटसचिवाकडे तीन सेवा सहकारी संस्थांचा प्रभार असून, त्या तीनही संस्थांच्या नावे वेतन काढले जाते. त्यापैकी एकच वेतन गटसचिवाला दिले जाते. उर्वरित रक्कम कोणाच्या नावे आहे. नफा-तोटा पत्रकातही त्या मुद्यांची नोंद होत नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे.सहकारी पतसंस्थांच्या संघाच्या मुख्य व तालुका स्तरावरील कार्यालयात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी, गटसचिवांना गेल्या चार ते पाच वर्षांपासून कार्यरत ठेवण्यात आले. हा प्रकार सहकार आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. सोबतच गटसचिव, सहायकांना लॅपटॉप खरेदीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज देण्यात आले. त्या कर्जाचे व्याज सहकारी संस्थांच्या संघाकडून भरले जात आहे. संघाने व्याज भरण्याचे कारण नसतानाही ते भरून नुकसान केले जात आहे. संस्था संगणकीकरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने करण्याचा आदेश असताना गटसचिवांना लॅपटॉप कर्जावर देण्यात आले. त्यामुळे या गंभीर प्रकरणी संघाची चौकशी करण्याचे उपनिबंधकांनी नमूद केले आहे. या अहवालानुसार तातडीने कारवाई न केल्यास न्यायालयीन लढाई सुरू केली जाईल, असेही यावेळी पुंडकर यांच्यासह ज्ञानेश्वर भोयर, विनोद हिंगणकर, आर.डी. पुरी यांनी सांगितले.- शेतकऱ्यांकडून सक्तीने व्याज वसुलीकर्जदार शेतकºयांकडून १ आॅगस्ट २०१७ नंतर व्याज घेऊ नये, असे शासनाने निर्देश दिले. तरीही अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकºयांकडून व्याज वसूल केल्याचे पावत्यांवरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची रॅण्डम पद्धतीने चौकशी करण्याचेही उपनिबंधकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला