मोटारसायकलस्वारास लुटले

By Admin | Updated: July 10, 2014 01:29 IST2014-07-09T18:08:46+5:302014-07-10T01:29:50+5:30

बाळापूर तालुक्यातील घटना; एका मोटारसायकलस्वारास अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून लुटले

Motorcycles robbed | मोटारसायकलस्वारास लुटले

मोटारसायकलस्वारास लुटले

उरळ: बाळापूर तालुक्यातील वझेगाव येथील एका मोटारसायकलस्वारास अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून त्याच्याकडील ४ हजार ३०० रुपये लुटल्याची घटना मंगळवार, ८ जुलै रोजी रात्री उशिरा घडली. उरळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वझेगाव येथील युवराज दादाराव वानखडे (२८) हे त्यांच्या जी.जे. १५ ए.आर. ४५६० क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी परत जात असताना रात्री ८.५० वाजताचे दरम्याम मोखा फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडविले. चोरट्यांनी गुप्तीचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळचे ४ हजार ३०० रुपये हिसकावून घेतले व ते तेथून पसार झाले. वानखडे यांनी याबाबत उरळ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार आत्माराम इंगोले व संजय भंडारी यांनी रात्री घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व चोरट्यांचा शोध घेतला; परंतु त्यांना कोणीही आढळले नाही.  

Web Title: Motorcycles robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.