मोटारसायकल झाडावर आदळली; युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 6, 2015 02:09 IST2015-04-06T02:09:45+5:302015-04-06T02:09:45+5:30
येवता रोडवरील अपघात.

मोटारसायकल झाडावर आदळली; युवकाचा मृत्यू
अकोला: भरधाव मोटारसायकल झाडावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन युवकाचा मृत्यू झाला. त्याचा सहकारीदेखील गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास येवता रोडवर घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मलकापूर परिसरात राहणारे शेख मोहसिन शेख हाशीमोद्दीन (२२) आणि त्याचा सहकारी शेषराव सुखदेव गोपनारायण हे दोघे रविवारी एमएच ३0 एएल ६३७ क्रमांकाच्या मोटारसायकलने येवता रोडवरून शहराकडे येत होते. शेख मोहसिनचे भरधाव मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटारसायकल येवता रोडवरील झाडावर आदळली. यात शेख मोहसिन जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी शेषराव गोपनारायण जखमी झाला. शेषराववर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत