अँपेवर आदळली भरधाव मोटारसायकल; युवक ठार
By Admin | Updated: February 12, 2016 02:16 IST2016-02-12T02:16:54+5:302016-02-12T02:16:54+5:30
मोटारसायकलवरील दोघांसह अँपे चालक गंभीर जखमी.

अँपेवर आदळली भरधाव मोटारसायकल; युवक ठार
अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अप्पू पॉइंटजवळ अँपेवर भरधाव मोटारसायकल आदळल्याने, मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलवरील एक युवक व युवती आणि अँपेचालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास घडली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आइस्क्रीमचे बॉक्स घेऊन एमएच ३0 एडी ३७२५ क्रमांकाचा अँपे बोरगाव मंजूकडे जात होता. दरम्यान, महामार्गावरून समोरून भरधाव वेगाने येणार्या एमएच ३0 एएम ९१९६ क्रमांकाच्या मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने, मोटारसायकल जोरदार अँपे वाहनावर जाऊन आदळली. यात बोरगाव मंजू येथील रहिवासी अक्षय धुरंदर हा जागीच ठार झाला. त्याचा सहकारी राजू विदोकार व एक युवती गंभीर जखमी झाली. अँपेचालक गुलामनबी खान हा सुद्धा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.