मोटारसायकलस्वाराला ट्रकने चिरडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:27 IST2017-09-19T00:25:56+5:302017-09-19T00:27:28+5:30
बाळापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर-खामगाव रस्त्यावर अकोल्याकडून खामगावकडे जाणार्या मोटारसायकलस्वाराला समोरून येणार्या ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना १८ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता घडली.

मोटारसायकलस्वाराला ट्रकने चिरडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर-खामगाव रस्त्यावर अकोल्याकडून खामगावकडे जाणार्या मोटारसायकलस्वाराला समोरून येणार्या ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना १८ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी गोपाळ ठोकळ (३0) व त्यांचा मित्र श्रीकृष्ण उत्तम भागवत हे १८ सप्टेंबर रोजी एम. एच. २८ ए.व्ही. ३0९५ क्रमांकाच्या मोटारसायकलने रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या रुग्ण नातेवाइकाच्या भेटीसाठी अकोल्यास गेले होते. ते तेथून मोटारसायकलने वाडी गावाकडे परत येत असताना खामगावकडेच येणार्या समोरील ट्रकने एकदम ब्रेक मारला. त्यामुळे मोटारसायकलस्वारानेदेखील अचानक ब्रेक लावला. यावेळी मोटारसायकलचा उभी करताना तोल जाऊन गोपाल ठोकळ हे रस्त्यावर पडले. दुर्दैवाने समोरून वेगात येणारा जी. जे. १९ एक्स. १५६४ क्रमांकाचा ट्रक रस्त्यावर पडलेल्या गोपाल ठोकळ यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचा मित्र श्रीकृष्ण भागवत हे रस्त्याच्या कडेवर पडल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही, तसेच मोटारसायकलचे नुकसान झाले नाही.
बाळापूर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू केली आहे. सदर अपघात स्थळावर पोलीस उपनिरीक्षक वाणी, काँस्टेबल कायंदे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुनील भोयर व कर्मचार्यांनी जखमीला सहकार्य केले .