मोटारपंप चोरणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:20 IST2021-03-01T04:20:49+5:302021-03-01T04:20:49+5:30

तीन चोरट्यांकडून मोटारपंप जप्त अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरब शेत शिवारातून मोटारपंप चोरणाऱ्या तीन चोरट्यांना अकोट ...

Motor pump theft gang arrested | मोटारपंप चोरणारी टोळी अटकेत

मोटारपंप चोरणारी टोळी अटकेत

तीन चोरट्यांकडून मोटारपंप जप्त

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरब शेत शिवारातून मोटारपंप चोरणाऱ्या तीन चोरट्यांना अकोट फाइल पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली. या चोरट्यांकडून दोन मोटारपंप जप्त करण्यात आले आहेत.

अकोट फाइलमधील परदेशीपुरा येथील रहिवासी योगेंद्र त्रिभुनाथ दुबे यांच्या खरब रोड शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी २६ फेब्रुवारी रोजी दोन मोटारपंप चोरी केले होते. या प्रकरणाची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर अकोट फाइलचे ठाणेदार महेंद्र कदम यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अकोट फाइलीतील पचमोरी येथील रहिवासी अंकुश सुधाकर धीसाळे, कैलास राजू इंगळे व घुसर येथील रहिवासी मंगेश तुकाराम गोपनारायण या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चोरट्यांनी मोटारपंप चोरी केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटारपंप जप्त केल्या आहेत. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हरिचंद्र दाते, सुनील टोपकर, शेख असलम, संजय पांडे, छोटू पवार, दिलीप इंगोले, राहुल चव्हाण, सिद्धार्थ जंजाळ यांनी केली.

Web Title: Motor pump theft gang arrested