Mother and daughter was swept away in the flood of Purna river | दर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या

दर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या

मूर्तिजापूर :  तालुक्यातील ग्राम दुर्गवाडा येथे देवदर्शनाला आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी  मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान पुर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या. त्यातील एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सकाळी  गावकºयांना सापडला. तर मुलीचा शोध घेणे सुरु आहे. 
अमरावती जिल्ह्यातील एक कुटुंब दुर्गवाडा येथील मुखोर्जी महाराज मंदिरात २१ सप्टेंबर रोजी आले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने गावी परत जाणे शक्य झाले नाही. विमल मनोहर अंभोरे रा. रेवसा (वलगाव), सारीका प्रदीप मोहोड, प्रदीप मोहोड, बेबीताई मोहोड सर्व राहणार रा. जामठी ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती यांनी रात्री मंदिरातच मुक्काम केला. यातील विमल मनोहर अंभोरे (६०) रा. रेवसा व सारीका प्रदीप मोहोड (३४) रा जामठी ता. नांदगाव खंडेश्वर या दोघी मायलेकी पहाटे ६ वाजताचे दरम्यान नदीकाठावर प्रातवीधीसाठी गेल्या असता पुर्णा नदीला अकस्मात आलेल्या पुरात दोघीही वाहून गेल्या. सततच्या पावसाने पुर्णा नदी दुथडी वाहत असताना लाखपूरी येथील काही लोक पुर पहाण्यासाठी व पट्टीचे पोहणारे जलतरण करीत असताना एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत येताना दिसला असता पोहणा?्या नागरीकांनी मृतदेह नदीकाठावर आणला. घटनेची माहिती पोलीस पाटील डिगांबर नाचणे यांनी ग्रामीण पोलीसांना देताच हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, हेड कॉन्स्टेबल शिवानंद मोहोड, आय बाईक पथकाचे नायक पोलीस शिपाई संतोष गवई, प्रवीण वाकोडे यांनी सहका?्यासह घटनास्थळ गाठले अधिक चौकशी दरम्यान दुर्गवाडा येथून वाहून गेल्याचे निष्पन्न झाले. मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे. (शहर प्रतिनिधी )

Web Title: Mother and daughter was swept away in the flood of Purna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.