नव्या वर्षात मृत्यूचे प्रमाण घटले; रुग्णवाढीची चिंता कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:13+5:302021-02-05T06:19:13+5:30
बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात ...

नव्या वर्षात मृत्यूचे प्रमाण घटले; रुग्णवाढीची चिंता कायम!
बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले
कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. जानेवारी महिन्यात ८०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर डिसेंबर महिन्यात १२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.
मागील चार महिन्यांतील स्थिती
महिना - पॉझिटिव्ह रुग्ण - मृत्यू - बरे झालेले रुग्ण
जानेवारी - १०८० - १३ - ८००
डिसेंबर - १०५८ - २९ - १२६६
नोव्हेंबर - १०३३ - १२ - ५७९
ऑक्टोबर - ८९३ - ४५ - २०२४
कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर राहून चालणार नाही. प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच नियमित साबणाने हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे. आरोग्य विभागाला सर्वसामान्यांनी साथ दिली, तरच कोरोना विरुद्धची लढाई जिंकणे शक्य होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला