शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

 ‘मोर्णा’ स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:49 PM

अकोला: अकोल्याच्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.१४ व्या टप्प्यातील या मोहिमेत तब्बल चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र रविवारी या उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

अकोला: अकोल्याच्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १४ व्या टप्प्यातील या मोहिमेत तब्बल चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र रविवारी या उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.जिल्हाधिकारी यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, की स्वच्छ पाणी आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छ करण्याचे आमचे मिशन होते. यास अकोलेकरांनी भरभरून साथ दिला. हे मिशन थांबणार नाही, तापत्या उन्हामुळे मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी नदीकाठी विकास कामे सुरूच राहणार आहेत. गरज भासल्यास आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा नदी स्वच्छतेसाठी जनतेला निश्चितपणे आवाहन करण्यात येईल. यावर्षीच्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत आजपर्यंत सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन नदीचे सात किलोमीटर पात्र स्वच्छ केले. यामध्ये तब्बल १३८ सामाजिक संस्थांनी मोहिमेत सहभाग घेतला.पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या मोहिमेचे कौतुक करून मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. हे नदी स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नदीच्या विकासासाठी यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सुमारे २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला, तर अकोट तलाठी संघटनेने रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. दरम्यान, मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा दिल्ली येथे सत्कार व्हावा, याकरिता अकोलेकरांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र देण्याबाबतचे आवाहन यावेळी दिल्लीचे आयएएस अधिकारी जगदीश पाण्डेय यांना केले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरीश पिंपळे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, योगेश पाटील, डॉ. मनीष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय