शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

एक लाखावर मेट्रिक टन खताचा साठा अधिक!

By admin | Updated: April 30, 2017 03:14 IST

५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन.

अकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठय़ाचे पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड)पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वा लाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पावसाचा अनुकूल अंदाज वर्तविल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर कृषी विभागाने येत्या खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शेतकर्‍यांना तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी यांत्रिकीकरण, बीबीएफ प्लॅटर आदीद्वारे पेरणी कशी करावी व विविध शेती तंत्रज्ञान वापरू न उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत; तसेच शेतकर्‍यांना दरवर्षी भेडसावणारा बियाणे आणि रासायनिक खताचा प्रश्न यावर्षी आतापासूनच निकाली काढण्यात आला आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ात मागील तीन वर्षात सरासरी ४ लाख ८३ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मागच्यावर्षी २0१६ च्या खरीप हंगामात ४ लाख ५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी ५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ११ हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या खताच्या साठय़ामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्पेटसह डीएपी खताचा साठा आहे.पश्‍चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ ते १७ लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता असली तरी चांगल्या पावसाचा अंदाज बघता कापसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.रासायनिक खताचा साठा यावर्षी मुबलक असून, बियाण्यांचीही मुबलकता आहे. त्यामुळे यावर्षी खते व बियाण्यांची अडचण भासणार नाही. पावसाचा अंदाजही अनुकूल असल्याने शेतकर्‍यांना अडचण भासू नये, यासाठीची तयारी कृषी विभागाने केली आहे. -एस.आर.सरदार,विभागीय संयुक्त संचालक, अमरावती.