शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून धडकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:33 IST

अकोला: अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या १५ जूनपर्यंत धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.

ठळक मुद्देयावर्षीच्या राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर सरासरी ६८३ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. नागपूर येथे याच कालावधीत सरासरी ९५८ मिमी सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या १५ जूनपर्यंत धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले. यावर्षीच्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल तसेच वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात आठ जिल्हे व चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्षा आर्द्रता, वाºयाचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर यावर्षीच्या राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. निकषात वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही, परभणी येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता असून, दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील.दरम्यान, पश्चिम विदर्भात ९५ टक्के पावसाचा अंदाज असून, अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर सरासरी ६८३ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भात ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. अशीच स्थिती बुलडाणा जिल्ह्याचीही असेल. नागपूर येथे याच कालावधीत सरासरी ९५८ मिमी सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ८८२ मिमी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सरासरी ११९१ मिमी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात यावर्षी ९५ टक्के पावसाची शक्यता असून, परभणी जिल्ह्यात सरासरी ८१५ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. कोकणात ९० टक्के पावसाचा अंदाज आहे. दापोली येथे जून ते सप्टेंबरपर्यंत ३३३९ मिमी सरासरीच्या ९० टक्के पाऊस होईल. उत्तर महाराष्टÑात ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सरासरी ४३२ मिमी या सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. धुळे सरासरी ४८१ मिमी ९७ टक्के, जळगाव सरासरी ६३९ मिमी ९६ टक्के पाऊस होईल. पश्चिम महाराष्टÑात ९५ टक्के पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर सरासरी ७०५ मिमी ९५ टक्के, कराड सरासरी ५७० मिमी ९६ टक्के, पाडेगाव सरासरी ३६० मिमी ९७ टक्के, सोलापूर सरासरी ५४३ मिमी ९० टक्के, राहुरी सरासरी ४०६ मिमी ९५ टक्के, पुणे सरासरी ५६६ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता आहे.

- राज्यात सरासरी ९५ टक्के पावसाची शक्यता असून, विदर्भात १५ जूनपर्यंत दमदार मान्सूनचे आगमन होईल. निकषानुसार वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात काही ठिकाणी पावसात मोठा खंड पडेल.- डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसVidarbhaविदर्भweatherहवामान