पावसाळा संपल्यानंतर लागला पावसाळा!
By Admin | Updated: April 14, 2015 00:20 IST2015-04-14T00:20:20+5:302015-04-14T00:20:20+5:30
ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी.झाला पाऊस ; ऋतूचक्र बदलले?

पावसाळा संपल्यानंतर लागला पावसाळा!
अकोला : पावसाळा संपल्यानंतर पावसाळा लागल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद नागपूर हवामानशास्त्र विभागाने केली आहे. यावर्षी प्रत्येक महिन्यात पाऊस येत असल्याने ऋ तूचक्र बदलल्याचे हे संकेत मानले जात आहेत. अकोला जिल्हय़ात सरासरी पावसाचे प्रमाण हे ७00 मि.मी.च्यावर आहे. मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवली. यावर्षी पावसाचा कालावधी समजल्या जाणार्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर २0१४ पासून ते एप्रिल २0१५ पर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्याप पावसाची शक्यता कायम असून, मागील वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी हा पाऊस गाठतो की काय, असेच एकूण चित्र आहे. २0१२-१३ या जिल्हय़ात केवळ ६७४ मि.मी. पाऊस पडला. २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला आणि १४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. डिसेंबरपर्यंत या पावसाची ६८0.७0 मि.मी. नोंद झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले असून, कधी कमी तर कधी जास्त, असे या पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी पडला आहे. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धापाऊस हा एकाच दिवशी काही तासात कोसळत असल्याचे या पावसाच्या आकडेवारीवरू न निदर्शनास येत आहे. यासंदर्भात डॉ कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळय़ाचे स्वरू प बदलले असल्याचे सांगीतले. अलीकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. संपूर्ण पावसाळ्य़ा तील पाऊस हा १६ ते १८ तासात पडत असून, अवेळी पाऊस वाढला आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात गेल्यावर्षी केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु त्यानंतर आजपर्यंत २५0 मि.मी. च्यावर पाऊस पडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.