शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:04 IST

Monsoon likely to reactivate in Vidarbha विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ठळक मुद्देपुढील २-३ दिवस पावसाचा अंदाज शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत!

अकोला : गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित आहेत. बहुतांश जिल्ह्यात कमी क्षेत्रावर पेरणी झाली असून कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मान्सून दरवर्षी भारत भेटीला येत असला तरी त्याचा प्रसार आणि मार्गक्रमण इतर देशाचे वातावरण नियंत्रित करीत असतात. बुधवारी बऱ्याच अवधीनंतर खांदेश, विदर्भ आणि मराठवाडा विभागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसून आली. बंगालच्या उपसागरावर सक्रिय प्रणालीचा जोर ओसरत आहे, ही मान्सूनच्या सामान्य प्रगतीकरिता सकारात्मक परिस्थिती आहे.

जमिनीवरील आर्द्रता ५० टक्क्याच्या आसपास आहे. जमिनीपासून दीड-तीन किलोमीटरपर्यंत तेच प्रमाण ८० टक्के अधिक आहे, ही स्थिती सर्वदूर पाऊस बरसण्याकरिता पूरक आहे. तापमान २८ ते ३३ डिग्री सेल्सिअसदरम्यान आहे. बुधवारपासून विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पुढील २-३ दिवस ही परिस्थिती सक्रिय राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या होत्या.

पुरेसा पाऊस म्हणजेच १०० मिमी बरसला. जमिनीत ओल १५-२० सेंटीमीटर आहे. ही खात्री करून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक पेरणी करणे फायदेशीर ठरते. पुढील काही दिवस पावसाचे राहण्याचा अंदाज आहे.

- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भRainपाऊस