मंगरुळपीरमधील चोरीचे मोबाइल अकोल्यात
By Admin | Updated: March 29, 2016 02:25 IST2016-03-29T02:25:40+5:302016-03-29T02:25:40+5:30
आकोट फैल व इराणी वसाहतमध्ये लोकेशन.

मंगरुळपीरमधील चोरीचे मोबाइल अकोल्यात
अकोला: मंगरुळपीरमधून चोरी झालेले तीन मोबाइल अकोल्यात आणण्यात आले असून, या तीनमधील दोन मोबाइलचे लोकेशन आकोट फैल परिसर असून, एका मोबाइलचे लोकेशन इराणी वसाहतमध्ये असल्याचे आयएमईआय क्रमांकावरून समोर आले आहे. या मोबाइलच्या शोधासाठी मंगरुळपीर पोलीस अकोल्यात दाखल झाले असून, त्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
मंगरुळपीर येथून गत आठवड्यात १0 हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल चोरी झाले असून, या प्रकरणाची तक्रार मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ह्यआयएमईआयह्ण क्रमांकाद्वारे या मोबाइलचा शोध सुरू केला असून, या तीनमधील दोन मोबाइलचे लोकेशन आकोट फैल परिसर आहे तर एका मोबाइलचे लोकेशन इराणी वसाहतमध्ये दाखवित आहे. त्यामुळे मंगरुळपीर पोलिसांनी सोमवारी अकोला गाठून या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मंगरूळपीर पोलीस अकोल्यात आल्याची नोंद त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली असून, अकोला शेजारी असलेल्या ठिकाणांवरून चोरीचे मोबाइल अकोल्यात खरेदी-विक्री होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.