शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कृषी विद्यापीठ परिसरातील हल्लेखोरे माकड जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:01 AM

पादचाऱ्यांवर हल्ले करणारे दोन माकड सोमवारी अकोला व अमरावती येथील बचाव पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद केले.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुचाकीचालक तसेच पादचाऱ्यांवर हल्ले करणारे दोन माकड सोमवारी अकोला व अमरावती येथील बचाव पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद केले. या दोन्ही माकडांना ट्रँग्युलाइज करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, सध्या ही माकडे वन विभागाच्या ताब्यात आहेत.कृषी विद्यापीठात सकाळी तसेच सायंकाळी फिरण्यासाठी येत असलेल्या नागरिकांवर तसेच येणाºया, जाणाºया दुचाकीचालकांवर या परिसरातील दोन माकडांनी हल्ला केला होता. या प्रकरणाची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या अमरावती व अकोला येथील बचाव पथकासह मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सोमवारी एक मोहीम राबवून सदर दोन्ही माकडे जेरबंद केली. या माकडांना ताब्यात घेण्यासाठी उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे, नितीन गोंडाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिंह ओवे, वनपाल गीते यांच्यासह बचाव पथकाचे ई. वाय. चौधरी, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, प्रवीण सरप, अनिल चौधरी, बंडू गावंडे, यशपाल इंगोले यांनी माकडांचा पाठलाग करून घेरले. त्यानंतर अमरावती येथील बचाव पथकाचे अमोल गावने यांनी ट्रँग्युलाइज करून माकडांना बेशुद्ध केले. दोन्ही बचाव पथकाने परिश्रम घेऊन ही मोहीम पार पाडली. बाळ काळणे हे कर्करोगाने ग्रस्त व दिव्यांग असताना वन्यजीव सेवा कार्य करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठwildlifeवन्यजीव